शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रेबीज लस प्रकरणी डॉक्टरांना बजावली 'कारणे दाखवा' नोटीस, रुग्णांना पाठवले होते बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:14 IST

आमदार आवाडे यांच्याकडून दखल

इचलकरंजी : इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णास रेबीज लस उपलब्ध नसल्याचे सांगून कोल्हापूर अथवा सांगलीला जाण्याचा सल्ला देण्याची घटना डॉक्टरांकडून घडली. युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी याची तक्रार अधीक्षकांकडे केल्यानंतर याची गंभीर दखल घेत डॉक्टर व लस नाही, असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तक्रारीनंतर तातडीने लस उपलब्ध करून देण्यात आली.जयभीमनगर येथील दोन व्यक्तींवर शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांमुळे घाबरलेल्या व्यक्तींनी रुग्णालयात धाव घेतली. यादरम्यान रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांनी रेबीज लसीचा साठा संपल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी सांगली अथवा कोल्हापूरला जाण्याचा सल्ला देण्याबरोबरच रेफर पत्रही दिले. संबंधित व्यक्तींनी ही माहिती आठवले यांना सांगितली. त्यांनी येऊन रुग्णालयात लसीबाबत विचारणा केल्यानंतर रेबीज लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींवर आयजीएम रुग्णालयात उपचार झाले.रुग्णालयात औषध साठा उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, अशा घटना डॉक्टरांकडून घडत असल्याने रुग्णालयातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. जनतेच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या रुग्णालयात उपचार होत नसतील, तर नागरिक कोठे जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदार आवाडे यांच्याकडून दखलरुग्णांना रेबीज लस मिळत नसल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांतून प्रसारित झाला होता. त्याची गांभीर्याने आमदार राहुल आवाडे यांनी दखल घेतली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका भाग्यरेखा पाटील यांना संबंधित घटनेचे गांभीर्य सांगितले. तसेच नाराजी व्यक्त केली. डॉ. पाटील यांनी संबंधित डॉक्टरांवर कारणे दाखवा नोटीस बजावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर