शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 25, 2024 15:33 IST

स्वतंत्र रांग किंवा प्राधान्य देण्याची मागणी

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या साजरा होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तृतीयपंथीयांचा वर्ग मात्र आजही मतदानाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. मतदान केंद्रांवर महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग असते, पण आम्ही कोणत्या रांगेत थांबायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना पडला आहे. त्यामुळे मतदानासाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग बनविण्याची किंवा मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.लोकसभेसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक विभागाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. मतदारांना समारंभ वाटावा, असे मतदान केंद्र साकारले जाणार आहे. तेथे त्यांना पाळणाघरापासून पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची सोय अशा सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरून टपाली मतदानाची सोय केली आहे. पण यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा फारसा विचार झालेला दिसत नाही.

बघण्याचा दृष्टिकोन विचित्रतृतीयपंथी मतदार जेंव्हा मतदान केंद्रांवर येतात तेंव्हा महिला व पुरुष मतदारांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. दुसऱ्या ग्रहावरची व्यक्ती आली आहे की काय अशा नजरेतून त्यांना सगळे न्याहाळत असतात. महिलांच्या किंवा पुरुषांच्या कुणाच्याही रांगेत थांबले तरी त्यांची चेष्टा होते.

जिल्ह्यात १८१ मतदारमतदार नोंदणी अत्यावश्यक असल्याचे समजल्यानंतर तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४८ हजार तृतीयपंथी आहे.

तृतीयपंथी समुदायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमी उपेक्षितच राहिला आहे. चेष्टा आणि विचित्र नजरांचा सामना करावा लागत असल्याने ते मतदानाला येण्याचे टाळतात. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग करावी किंवा मतदानाला त्यांना प्राधान्य द्यावे. -मयुरी आळवेकर, अध्यक्षा, मैत्री तृतीयपंथीय संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरVotingमतदानElectionनिवडणूक