Kolhapur: सासूच्या निधनाचा धक्का, सूनेनेही सोडला आपला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 02:17 PM2024-03-30T14:17:56+5:302024-03-30T14:20:33+5:30

दोघींमधील नाते माय-लेकीसारखे होते. त्यामुळे सासूच्या निधनाचा मंगल यांना मोठा धक्का बसला

Shocked by the death of the mother in law, the daughter in law also gave up her life in kolhapur | Kolhapur: सासूच्या निधनाचा धक्का, सूनेनेही सोडला आपला प्राण

Kolhapur: सासूच्या निधनाचा धक्का, सूनेनेही सोडला आपला प्राण

कोल्हापूर : वृद्धापकाळात सासूची आईसारखी सेवा केलेल्या सुनेला सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांचेही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची घटना कोल्हापुरातील दुधाळी, उत्तरेश्वर पेठ परिसरात शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेने सासू-सुनेच्या नात्यामध्ये किती जिव्हाळा असू शकतो याचा प्रत्यय दिला असला तरी आई आणि पत्नीला गमावण्याची वेळ एका दुर्दैवी पतीवर आली. 

येथील बाबूराव परशराम शेटके यांच्या आई लक्ष्मीबाई परशराम शेटके (वय ९०) यांचे गुरुवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. सासू लक्ष्मीबाईंची सून मंगल यांनी पहिल्यापासूनच चांगली सेवा केली होती. या दोघींमधील नाते माय-लेकीसारखे होते. त्यामुळे सासूच्या निधनाचा मंगल यांना मोठा धक्का बसला. लक्ष्मीबाई यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकून घरातील मंडळी घरी येण्याआधीच मंगल शेटके (६१) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 

त्यांना त्वरित पंचगंगा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आईच्या निधनाने दु:ख सागरात बुडालेल्या बाबूराव शेटके यांना काही वेळातच पत्नीच्याही निधनाचा मोठा धक्का बसला. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे तर मंगल शेटके यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवारी आहे.

Web Title: Shocked by the death of the mother in law, the daughter in law also gave up her life in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.