गजबजलेल्या बस स्टँड परिसरातच शिवशाही बसचा ब्रेक फेल, धडकेत वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:39 PM2022-04-27T16:39:19+5:302022-04-27T16:46:53+5:30

या थरारानंतर अनेक प्रवाशांची, नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

Shivshahi bus brakes fail in kolhapur bus stand area | गजबजलेल्या बस स्टँड परिसरातच शिवशाही बसचा ब्रेक फेल, धडकेत वाहनांचे नुकसान

गजबजलेल्या बस स्टँड परिसरातच शिवशाही बसचा ब्रेक फेल, धडकेत वाहनांचे नुकसान

googlenewsNext

कोल्हापूर : नेहमीच मोठी वर्दळ असलेल्या बस स्टँड (सीबीएस) परिसरातच शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने एकच गोंधळ उडाला. ब्रेक निकामी झाल्याने या बसची अनेक वाहनांना धडक झाली. या थरारामध्ये सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. आज, मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. या थरारानंतर अनेक प्रवाशांची, नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पुणे-कोल्हापूर-पणजी ही बस कोल्हापूर स्टँड मधून पणजीकडे निघाली होती. महालक्ष्मी चेम्बर्सच्या दारात बस आली असता प्रवासी घेण्यासाठी शिवशाही बस थांबली. दरम्यान, अचानक बसचा ब्रेक निकामी झाला अन् बस मागे जावू लागली.

यावेळी आजूबाजूंच्या लोकांनी आरडाओरडा केला. चालकाने प्रसंगावधान राखत एका बंद असलेल्या गाळ्याला बस धडकवली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यावेळी याठिकाणी उभ्या असलेल्या मोटारसायकल आणि एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Shivshahi bus brakes fail in kolhapur bus stand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.