शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

शिवाजी विद्यापीठ देणार आता आरोग्यवर्धक हळदीची गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 5:17 PM

जेवण स्वादिष्ट बनविणारी हळद ही औषधी आणि आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरणारी आहे. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाने आरोग्यवर्धक, कुरकुमीनयुक्त, चघळता येणाºया हळदीच्या गोळीची (च्युएबल टॅबलेट्स) निर्मिती केली आहे; त्यासाठी या विभागातील संशोधक आणि इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर इन बॉटनीचे समन्वयक डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी वर्षभर संशोधन केले आहे.

ठळक मुद्देवनस्पतिशास्त्र विभागातील मानसिंगराज निंबाळकर यांचे संशोधन कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या घटकाचा समावेश

संतोष मिठारीकोल्हापूर : जेवण स्वादिष्ट बनविणारी हळद ही औषधी आणि आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरणारी आहे. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाने आरोग्यवर्धक, कुरकुमीनयुक्त, चघळता येणाऱ्या हळदीच्या गोळीची (च्युएबल टॅबलेट्स) निर्मिती केली आहे; त्यासाठी या विभागातील संशोधक आणि इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर इन बॉटनीचे समन्वयक डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी वर्षभर संशोधन केले आहे.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड आणि शेजारील कोकणामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ते घेणाऱ्या शेतकऱ्यांना काही अधिकचे उत्पन्न मिळावे, या उद्देशाने वनस्पतिशास्त्र विभागात हळदीच्या विविध जातींवर संशोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निरोगी रोपांसाठी ऊतीसंवर्धन, कुरकुमीन या घटकाला वेगळे करण्याच्या पद्धती, औषधी उपयोग, आदी प्रयोगांचा समावेश आहे.

त्याअंतर्गत विद्यापीठाच्या इनक्युबेशन अ‍ॅँड ट्रेनिंग सेंटर इन बॉटनी आणि रुसा सेंटर फॉर नॅचरल प्रॉडक्टस अ‍ॅँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन या विभागांनी संयुक्त संशोधन केले. त्यातून हळदीच्या चघळता येणाºया गोळीची निर्मिती झाली.

जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या प्रतिदिन मात्रा विचारात घेऊन या गोळीची पान, मिंट, जिंजर अशा फ्लेव्हरमध्ये निर्मिती केली आहे. फ्लेव्हर्समध्ये निर्मिती करताना त्याला शास्त्रीय आधार देऊन औषधी गुणधर्म कायम राहतील, याची दक्षता संशोधकांनी घेतली आहे. या संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठ आता समाजाला आरोग्यवर्धक हळदीची गोळी उपलब्ध करून देणार आहे.‘कुरकुमीन’ कायम ठेवून निर्मितीहळदीतील औषधी महत्त्व असणारा कुरकुमीन हा घटक पाण्यात न विरघळणारा आहे. शिवाय सहजासहजी शरीरात शोषला जात नाही; त्यामुळे त्याचे फायदे मिळवायचे झाल्यास त्याला इतर घटकांसोबत घेणे आवश्यक असते; त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून हळद ही दूध, तेल अथवा तुपासोबत घेतली जाते.

बाजारात उपलब्ध असणाऱ्या हळदीच्या बहुतेक गोळ्यांमध्ये ‘कुरकुमीन’ हा घटक वेगळा काढून त्यापासून गोळ्या बनविल्या जातात; मात्र आम्ही कुरकुमीन वेगळे न काढता या गोळ्यांची निर्मिती केली असल्याचे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.‘स्टार्टअप’द्वारे बाजारात आणणारइनक्युबेशन सेंटरद्वारे या गोळ्या स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यापीठ बाजारात आणणार आहे. या संशोधनाचे पेटंट घेतले जाणार आहे. या संशोधनासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. आर. के. कामत यांचे मार्गदर्शन लाभले, असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर