शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

शिवाजी पाटील, जाधव, आभा देशपांडे, यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 3:55 PM

राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत शिवाजी पाटील, विनायक जाधव, आभा शंशाक देशपांडे यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण प्रजासत्ताकदिनी रविवारी (दि. २६) सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देशिवाजी पाटील, जाधव, आभा देशपांडे, यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून घोषणा; प्रजासत्ताकदिनी वितरण

कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत शिवाजी पाटील, विनायक जाधव, आभा शंशाक देशपांडे यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण प्रजासत्ताकदिनी रविवारी (दि. २६) सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.जिल्ह्यातील व्हॉलीबॉलमधील शिवाजी पांडुरंग पाटील यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, तर फेन्सिंग सॅपक टाकरा क्रीडा प्रकारातील विनायक दिगंबर जाधव यांना गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-संघटक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

पॉवरलिफ्टिंगमधील सुनील परशराम कोनेवाडकर, जलतरणातील आभा शंशाक देशपांडे आणि क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्समधील कमलाकर सुरेश कराळे (दिव्यांग) यांना गुणवंत खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पॉवरलिफ्टिंगमधील सोनल सुनील सावंत आणि टेबल टेनिसमधील वैष्णवी विनायक सुतार हिला गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख १0 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.

‘खेलो इंडिया’तील खेळाडूंचा सत्कारया सर्व पुरस्कारांसाठी एकूण १६ अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती’ने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यांच्या वितरणावेळी ‘खेलो इंडिया स्पर्धे’तील पदक प्राप्त खेळाडूंचाही सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती साखरे यांनी दिली. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर