शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना मिळते प्रेरणा, तेच आमच्या रेजिमेंटचे आदर्श!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 1:10 PM

भारतीय सैन्याला नामोहरम करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना प्रेरणा  : लेफ्ट जनरल पन्नूमराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या मुजियमचे उदघाटन

बेळगाव  छत्रपती शिवाजी महाराजांपासून जवानांना ऊर्जा प्रेरणा मिळते त्यामुळेच जवान सीमेवरील शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज असतात. शिवाजी महाराज आमच्या रेजिमेंटचे आदर्श आहेत. भारतीय सैन्याला नामोहरम करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे. शत्रू लढाईसाठी आव्हान देईल याची आम्ही प्रतीक्षा करत असतो असे मत कर्नल ऑफ रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी. जे. एस .पन्नू यांनी काढले.मराठा सेंटर मधील मराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या मुजियमचे उदघाटन लेफ्टनंट जनरल पी जे एस पंन्नू यांनी केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी  हे मत मांडले. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, ब्रिगेडियर गोविंद कलवड आणि जेष्ठ पत्रकार किरण ठाकूर उपस्थित होते.तत्पूर्वी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 492 जवानांचा दीक्षांत आणि शपथविधी कार्यक्रम तळेकर ड्रिल स्क्वेअर येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पी.जे.एस.पन्नू उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी तिरंगा आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ घेतली.नंतर जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली.

नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेला सिद्ध झालेल्या जवानांचे मी अभिनंदन करतो.त्यांच्या पालकांनी देखील त्यांना सैन्यात दाखल केल्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण अत्त्युत्तम आहे. या प्रशिक्षणाचा तुम्हाला मातृभूमीच्या रक्षणासाठी उपयोग होणार आहे.मराठा इन्फंट्रीला गौरवपूर्ण इतिहास आहे.या परंपरेची जबाबदारी तुमच्यावर आहे असेही पन्नू म्हणाले.मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेन्टरच्या वस्तू संग्रहालयाचे उदघाटन पन्नू यांच्या हस्ते करण्यात आले. वस्तूसंग्रहालयाची माहिती मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.नंतर जवानांच्या स्मारकाला भेट देऊन अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहिले.प्रशिक्षण कालावधीत बजावलेल्या गौरवपूर्ण कामगिरी बद्दल जवान बाळू सिद्धप्पा धनगर, कल्लप्पा शंकर तोनपे , कल्लप्पा देवप्पा लोंढे, परशुराम, रामदास शिवाजी पाटिल, भरत शाहपुरकर याना पन्नू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे,लष्करी अधिकारी, जवान आणि जवानांचे नातेवाईक उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती