शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू ...

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकवून त्याला वंदन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुतळ्यासभोवतालचा परिसर पुष्पमालांनी सुशोभित करण्यात आला होता. या पुतळ्यालाही कुलगुरूंसह मान्यवरांनी अभिवादन केले. कोविडच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, श्रीकृष्ण महाजन, डॉ. एम. एस. देशमुख, नमिता खोत, ए. एम. गुरव, आर. व्ही. गुरव, पी. टी. गायकवाड, अभय जायभाये, आदी उपस्थित होते. दरम्यान, दिवसभरात शिवप्रेमी आबालवृद्धांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

फोटो (१९०२२०२१-कोल-विद्यापीठ शिवजयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, आदी उपस्थित होते.