शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मायाप्पाच्या निधनाने शिरोळ तहसील कार्यालय सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

मायाप्पा दाखला झाला का, मायाप्पा लवकर दे की, अशा हाकेने शिरोळ तहसील कार्यालयातील शाहू सेतू केंद्र दिवसभर गजबजत होते. ...

मायाप्पा दाखला झाला का, मायाप्पा लवकर दे की, अशा हाकेने शिरोळ तहसील कार्यालयातील शाहू सेतू केंद्र दिवसभर गजबजत होते. तर सगळ्यांना दोस्ता, मित्रा, ताई, काका, दादा तुमचं काम होईल थोडा वेळ थांबा, अशी प्रेमाची हाक देत काम करणारा मायाप्पा कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शिरोळ तहसील कार्यालय ते औरवाड परिसरात सर्वांना धक्का बसला आहे. मायाप्पा श्रावण कांबळे (वय ३३) च्या अचानक जाण्याने अनेकांचा काळजाचा ठोका चुकला आहे.

शिरोळ तहसील कार्यालयात शाहू सुविधा केंद्र सेतूचे व्यवस्थापन औरवाडमध्ये राहणारा तरुण मायाप्पा करीत होता. हलाखीची परिस्थितीला तोंड देत त्याने अल्पावधीत प्रगती केली होती. शिरोळ तालुक्यातील दररोज जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले यासह अनेक कामासाठी येणाऱ्या शेकडो लोकांना कामाच्या तणावातून तोंड देत काम करीत होता. ग्रामपंचायत निवडणूक असो की शैक्षणिक कामासाठी दिवस- रात्र राबत दाखले उपलब्ध करीत असे. तहसीलदार असो की नायब तहसीलदार सगळ्यांनी मायाप्पाच्या कामाचे कौतुक केले आहे. शनिवार, रविवारची सुट्टीची पर्वा न करता मायाप्पा काम करीत असे.

दोन आठवड्यांपूर्वी मायाप्पाला कोरोनाची लागण तहसील कार्यालयात काम करताना झाली. सुरुवातीस त्रास नसल्याने उदगाव येथील कुंजवन कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर तब्येत खालावल्याने सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन आठवडे कोरोनाविरोधात सुरू असलेल्या संघर्षात अखेर मायाप्पाची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आईवडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या जाण्याने नेहमी तहसील कार्यालयात मायाप्पा काम झाल का? ही हाक आत ऐकू येणार नाही.

फोटो - २९०५२०२१-जेएवाय-०१-मृत मायाप्पा कांबळे