Kolhapur: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन शोध घेत आवळल्या आरोपींच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:23 IST2025-01-22T19:21:51+5:302025-01-22T19:23:15+5:30

चौघे अटकेत; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी 

Shirol police arrested four persons in connection with the kidnapping of a school girl | Kolhapur: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन शोध घेत आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Kolhapur: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन शोध घेत आवळल्या आरोपींच्या मुसक्या

गणपती कोळी 

कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथील शाळकरी मुलीच्या अपहरण प्रकरणी शिरोळ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेवून अटक केली आहे. अजय भीमा कोळी (वय २७), बबलु बाबु कोळी (२८) अशोक शंकर कडकलक्ष्मी उर्फ कोळी (२५) व सचिन बाळू दुर्गमुर्ग (२० सर्व रा. वाळकेनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दोन अल्पवयीन मुली नांदणी रस्त्याला असलेल्या मळा भागातील घटाकडे पायी जात होत्या. संशयित आरोपींनी कार मुलीजवळ थांबवून ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने नागरीक धावून येताच आरोपींनी पळ काढला होता.

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेज वरुन वाहनाचा शोध घेवून शिरोळ पोलिसांनी बुधवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

Web Title: Shirol police arrested four persons in connection with the kidnapping of a school girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.