शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीचा गुंता सुटला, कोल्हापूरचा का अडला..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या नियुक्तीवर शासनाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्याचे राजपत्रच प्रसिद्ध झाल्याने आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची निवड कधी होणार, याची उत्सुकता आहे. परंतु समिती बरखास्तीचा वादच न्यायालयात गेल्याने ही निवड लोंबकळणार असेच चित्र आहे.

मुळात दोन्ही काँग्रेसपैकी ही देवस्थान समिती कुणाच्या वाट्याला जाणार, हा मोठा गुंता आहे व तो सुटल्यावर मग त्यावर कुणाची वर्णी लागणार, हा त्यानंतरचा गुंता आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची या पदावर पाच वर्षांकरिता ऑगस्ट २०१७ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा कालावधी संपण्यास १६ महिन्यांचा अवधी असतानाच महाविकास आघाडीने ही समिती बरखास्त केली. त्याविरोधात भाजपचे असलेले जाधव उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात तीन सुनावण्या झाल्या. राज्य शासनानेही म्हणणे मांडले आहे. परंतु, जोपर्यंत न्यायालयाकडून समिती बरखास्त करण्याचा शासनाचा निर्णय वैध ठरवला जात नाही, तोपर्यंत या समितीवरील अध्यक्षपदाची नियुक्ती करता येत नाही. राष्ट्रवादीकडून पक्षाचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी या पदासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांची व्हेटो पॉवर वापरली होती. परंतु, जोपर्यंत न्यायालयीन वाद मिटत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही.

कुणाच्या पाठीशी कुठले देवस्थान

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, मुंबईचा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, शिर्डीचे साईबाबा संस्थान ट्रस्ट आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ही प्रमुख धार्मिक, आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्रे आहेत. शिर्डी व पंढरपूर मंदिरांचे व्यवस्थापन प्रशासक मंडळाकडे होते. शिर्डी राष्ट्रवादीकडे गेल्याने पंढरपूर देवस्थान काँग्रेसला देण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर गेली अनेक वर्षे शिवसेनेकडेच असून, आदेश बांदेकर त्याचे अध्यक्ष आहेत.

आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत्रे..

शासनाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केल्यावर समितीची सूत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहेत. महेश जाधव यांच्या काळात जी विविध कामे झाली, त्याबद्दल ते पदावरून दूर जाताच मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात बारकाईने लक्ष घातले आहे. त्याची चौकशी, कारणे दाखवा नोटीस अशी कारवाई सुरू झाली आहे. या ना त्या कारणाने देवस्थान समिती चर्चेत आहे.