शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच चालवतोय दवाखान्याचा कारभार !

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

‘अडकूर’चा दवाखाना अधिकाऱ्यांविनाच : पशुमालकांची गैरसोय; औषधांचाही तुटवडा

विजयकुमार कांबळे - अडकूर (ता. चंदगड) येथील जनावरांचा दवाखाना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच असून, शिपाईच पाहतोय ‘श्रेणी - १’च्या दवाखान्याचा कारभार. त्यामुळे बिचाऱ्या मुक्या जनावरांना उपचाराविना प्राणास मुकावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
चंदगड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून अडकूरची ओळख आहे. भाजीपाल्याबरोबरच जनावरांचा बाजारही प्रसिद्ध आहे. म्हणून येथे चंदगड-आजरा-गडहिंग्लजसह कर्नाटकाहूनही व्यापारी मोठ्या संख्येने येतात. जनावरांची खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात केली जाते. बुधवारचा आठवडा बाजार असल्याने दवाखान्यातही मोठी गर्दी होते. यावेळी गाभण तपासणी, रेडे, बैल व बोकडांचे खच्चीकरण करण्यासाठी गर्दी होेते. तसेच जनावरांना बिल्ले मारणे यासाठी श्रेणी-१च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच प्रामुख्याने गरज असते. मात्र, वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने पशुमालकांना ताटकळत बसण्याची वेळ येत आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला आहे. भरपूर दूध देणाऱ्या संकरित गायी-म्हशी लाखो रुपये देऊन आणल्या जात आहेत, तसेच नवीन संकरित कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म व शेळ्या-मेंढ्यांचे मोठ्या प्रमाणात पालनही पहायला मिळत आहे. तसेच शासनाच्या अनेक योजना आहेत.
डॉक्टरच वेळेत हजर नसल्याने शासनाच्या विविध योजनेच्या लाभाविनाच वंचित राहण्याची वेळ गोरगरीब पशुपालकांवर आली आहे. असुलभ प्रसूती, मायांग बाहेर येणे तसेच घटसर्प, फऱ्या, लाळखुरकत या संसर्गजन्य साथीच्या आजारांत जनावरांना वेळेत उपचार न झाल्यास प्राण गमवावा लागतो आहे, तर अनेक कारणांनी मृत झालेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या डॉक्टरांची वाट पहावी लागते.
एवढेच नव्हे, तर दवाखान्यात खांदमलम तसेच इतर औषधांचा तुटवडाही असल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरच वेळेत उपलब्ध नसल्याने दवाखान्यालाच उतरती कळा लागली की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दवाखान्याच्या आवारात गेट नाही, येथे असणारा खोडाही मोडलेल्या स्थितीत असल्याने त्याचीच जखम जनावरांना अधिक होईल का, अशी भीती व्यक्त होत आहे. असे हे किती दिवस चालणार? शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी कुणाचा आधार घ्यायचा, असा प्रश्न निर्माण होत
आहे.

दोन वर्षे वैद्यकीय अधिकारीपद रिक्त
आमरोळी, अडकूर, उत्साळी, केरवडे, सातवणे पंचक्रोशीसह २२ गावांचा समावेश असलेल्या श्रेणी १ या दवाखान्यात मात्र गेले दीड ते दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून, त्याठिकाणी प्रभारी म्हणून डॉ. एस. पी. पेडणेकर काम पाहत आहेत. मात्र, डॉ. पेडणेकर वेळेत उपलब्ध नसल्याने गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन वेळेत होत नसून, त्यामुळे वांझ प्रमाण वाढण्याची भीती निर्माण होत आहे.

दोन वर्षे वैद्यकीय अधिकारीपद रिक्त
आमरोळी, अडकूर, उत्साळी, केरवडे, सातवणे पंचक्रोशीसह २२ गावांचा समावेश असलेल्या श्रेणी १ या दवाखान्यात मात्र गेले दीड ते दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून, त्याठिकाणी प्रभारी म्हणून डॉ. एस. पी. पेडणेकर काम पाहत आहेत. मात्र, डॉ. पेडणेकर वेळेत उपलब्ध नसल्याने गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन वेळेत होत नसून, त्यामुळे वांझ प्रमाण वाढण्याची भीती निर्माण होत आहे.