शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘आप्पां’ची शिट्टी, दक्षिणेत बंटींची सुट्टी-- विधानसभा निवडणूक

By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST

अमल महाडिक जाएंट किलर : ८५२८ मताधिक्यांनी विजयी

विधानसभा निवडणूककोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवून भाजपच्या अमल महाडिक यांनी विजय मिळविला. शहरात टोलविरोधी आंदोलन पेटले असताना टोलची पावती फाडणाऱ्या माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची ‘पावती’ लोकांनी त्यांचा एकतर्फी पराभव करून फाडल्याची प्रतिक्रिया निकालानंतर व्यक्त झाली. महाडिक यांनी अवघ्या २२ दिवसांत हा विजय मिळविला. सतेज पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली प्रचंड नाराजी, पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील नेत्यांशी घेतलेले वैर, ‘काँग्रेसचा हात नको’ ही शहरी मतदारांतील मानसिकता आणि मोदी लाटेचा प्रभाव या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सतेज पाटील यांचा दारुण पराभव झाला.विश्वास पाटील/ संतोष मिठारी ल्ल कोल्हापूरजिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधलेल्या या मतदार संघात लक्षवेधी लढत होती. सतेज पाटील यांनी मतदारसंघात चांगली विकासकामे केली. त्यांचा जनसंपर्कही चांगला होता; परंतु राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे बदललेले वागणे लोकांना खटकले. त्यातून झालेली नाराजी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. अमल महाडिक यांचे व्यक्तिमत्त्व फारसे प्रभावी नाही. त्यांचे वडील आमदार महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे. चुलतभाऊ धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार; त्यामुळे महाडिक यांच्या घरातच किती पदे देणार, असा प्रचार झाला. महाडिक यांच्या दलबदलू राजकारणाचा मुद्दाही चांगलाच चर्चेत होता. कोल्हापूरचे राजकारण पुन्हा महाडिकांच्या हातात द्यायला नको, असा प्रचार जोरात होऊनही लोकांनी तो मनावर घेतला नाही. अमल यांना पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत सतरा फेरीत मताधिक्य मिळाले. याचा अर्थ लोकांनी सतेज पाटील यांना पाडायचेच, हे पक्के ठरविले होते. काँग्रेसबद्दलची नाराजीही सतेज पाटील यांना भोवली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांनी मदत करूनही त्यांनी यावेळेला उलट भूमिका घेतली. त्याबद्दल लोकांत नाराजीचा सूर होता; परंतु तो मतयंत्रात उमटला नाही. त्यापेक्षा काँग्रेसला मतदान नको, ही भावना जास्त प्रबळ ठरली. शिवसेनेचे विजय देवणे हे किमान २५ हजारांपर्यंत मतदान घेतील व त्याचा लाभ आपल्याला होईल, असेही सतेज पाटील यांना वाटत होते; परंतु शिवसेनेच्या शंभरावर शाखा आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश आले. शिवसैनिक भाजपकडे वळले. अन्य मतदारसंघांत शिवसेना विजयीपथावर असताना याच मतदारसंघात ती मागे पडली; कारण तिची रसद कमळाला मिळाली हेदेखील महत्त्वाचे ठरले. महाडिक यांच्याकडे वादळात दिवा लावण्याची ताकद आहे. वारे कोणत्या दिशेला वाहते हे ते नेमकेपणाने ओळखतात. अनेकदा राजकीय जुगार खेळण्याचा त्यांचा स्वभाव आहे. अमल यांची निवडणूकही जुगारच होता. ते स्वत: या चित्रात कुठेच नव्हते. ते काही बोलले की, लोक चिडून महाडिक विरोधात काम करतात म्हणून निवडणुकीत ते एक वाक्यही बोलले नाहीत. पडद्याआड राहून त्यांनी सारेच करून दाखविले. उलट थेट पाईपलाईन, कळंबा तलावाचा विकास, उपनगरांचा नागरी विकास, गावोगावी केलेली विकासकामे, गट म्हणून मजबूत संघटन हे पाठीशी असतानाही सतेज पाटील यांना विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. या पराभवाने त्यांनाही जनतेने जमिनीवर आणून ठेवले.जनतेच्या विश्वासावर विजय : अमल महाडिकआमदार म्हणून जरी निवडून आलो, तरी मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. जनतेच्या विश्वासावर विजय संपादित केला आहे. जनतेच्या व्यथा सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. टोल, एल. बी. टी. मुक्तता आणि तीर्थक्षेत्र, खंडपीठ, आदी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील. कोल्हापूरच्या विकासासाठी विरोधकांनाही सोबत घेऊन काम करणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली, त्यांचा माझ्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे. लोकशाहीचा निर्णय मान्यलोकशाहीचा निर्णय मला मान्य आहे. माझ्या मतदारसंघात ३०७ कोटींची विकासकामे केली; पण दुर्दैवाने लोकांपर्यंत ती पोहोचली नाहीत अथवा त्यांनी ती गृहीत धरली नाहीत. नवख्या उमेदवाराला नेतृत्व करण्याची संधी या मतदारसंघातील जनतेने दिली आहे. तरीही थेट पाईपलाईन, कळंबा तलाव सुशोभीकरण, आदी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. - सतेज पाटील कौल मान्यकोल्हापूर दक्षिणच्या जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. पूर्वीप्रमाणेच यापुढेदेखील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी माझा लढा, आंदोलने सुरूच राहणार आहेत. - विजय देवणे