शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सेना गेलेले पती’ अशी शेट्टींची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नव्हे, राजकीय पक्षांचे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू ...

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नव्हे, राजकीय पक्षांचे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती, अशी अवस्था असून त्यांच्यामागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

बांबू शेती लागवडीबाबत पटेल संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करत आहेत. मंगळवारी ते कोल्हापुरात आले होते. पटेल म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांनी दोन महिने आंदोलन करून काय पदरात पाडून घेतले? केवळ विरोधाला विरोध करणे एवढाच कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील ४० टक्के शेती ही करार पध्दतीनेच केली जाते. हा कायदाही ऐच्छिक आहे, मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.

पृथ्वीवर प्रदूषण वाढत असल्याने बहुउपयोगी बांबूच्या लागवडीसाठी आपली परिक्रमा सुरू आहे. बांबूचे एक झाड वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देते. यापासून इथेनॉलसह अनेक वस्तू तयार करता येतात. केंद्र सरकारच्या नॅशनल बांबू मिशन, अटल बांबू मिशन व रोजगार हमीमधून बांबूला पैसे दिले जातात. एकरात एक लाख झाडे लावता येतात. चौथ्या वर्षापासून त्याचे उत्पन्न सुरू होते. शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे, असे आवाहन पाशा पटेल यांनी केेले.

यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भगवान काटे, विजय जाधव आदी उपस्थित होते.

मग पवार गैरहजर का?

स्वत:ला शेतकऱ्यांचा आत्मा समजणारे शरद पवार शेतकरी विधेयकावेळी राज्यसभेत का उपस्थित नव्हते. आता मात्र दुहेरी भूमिका घेऊन राजकारण सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.