शिरढोण युवक संघटनेच्या वतीने चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाला शेणीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:20+5:302021-05-23T04:24:20+5:30

शहरात सध्या कोरोनाची दुसरी लाट उद्भवली असून त्यामध्ये अवघ्या महिनाभरात कोरोनाने 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या ...

Shenidan on behalf of Shirdhon Youth Association to Chanakya Funeral Service Board | शिरढोण युवक संघटनेच्या वतीने चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाला शेणीदान

शिरढोण युवक संघटनेच्या वतीने चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाला शेणीदान

शहरात सध्या कोरोनाची दुसरी लाट उद्भवली असून त्यामध्ये अवघ्या महिनाभरात कोरोनाने 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांवर येथील पंचगंगा स्मशानभूमीत चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळ यांचेकडून विनामूल्य अंत्यविधी करण्यात आले आहेत. वाढत्या मृत्यू संख्येमुळे चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाकडे शिल्लक असणारा शेणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे चाणक्य मंडळाच्या वतीने ग्रामीण भागातील जनतेला शेणी देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिरढोण येथील युवक संघटनेच्या वतीने शनिवारी चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा यांच्याकडे दोन हजार शेणी देण्यात आली. याप्रसंगी विश्‍वास बालिघाटे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबू, बाबासाहेब हेरवाडे, अविनाश चौताळे, संजय पाटील, देवदत्त आंबेकर, आदी उपस्थित होते.

(फोटो ओळी)

शिरढोण येथील युवक संघटनेच्या वतीने शनिवारी चाणक्य अंत्यसंस्कार सेवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा यांच्याकडे दोन हजार शेणी देण्यात आली. याप्रसंगी विश्‍वास बालिघाटे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबू, बाबासाहेब हेरवाडे, अविनाश चौताळे, संजय पाटील, देवदत्त आंबेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Shenidan on behalf of Shirdhon Youth Association to Chanakya Funeral Service Board