दुसऱ्यांबरोबर बोलते म्हणून ‘इन्स्टा’वर तिची बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 06:57 IST2023-04-25T06:57:32+5:302023-04-25T06:57:51+5:30

मित्राच्या इन्स्टा अकाऊंटवरून आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या संगणकावरून बनावट खात्यांवरून तो अश्लील मेसेज व्हायरल करत होता

She is defamed on 'Insta' for talking to others in kolhapur | दुसऱ्यांबरोबर बोलते म्हणून ‘इन्स्टा’वर तिची बदनामी

दुसऱ्यांबरोबर बोलते म्हणून ‘इन्स्टा’वर तिची बदनामी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इतर तरुणांबरोबर बोलते म्हणून इन्स्टाग्रामवरून तरुणीची बदनामी करणाऱ्या प्रथमेश ऊर्फ सोन्या दत्तात्रय पाटील (वय २२, रा. भैरवनाथ गल्ली, पाचगाव, ता. करवीर) याला पोलिसांनी अटक केली. 

मित्राच्या इन्स्टा अकाऊंटवरून आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या संगणकावरून बनावट खात्यांवरून तो अश्लील मेसेज व्हायरल करत होता. प्रथमेश याची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. पाचगाव येथील एका तरुणीबद्दल इन्स्टाग्रामवरून अश्लील मेसेज पाठवून तिची बदनामी केली जात होती. ऑगस्ट २०२२ मध्ये सुरुवातीला हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुणीने करवीर आणि सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर काही महिने अश्लील मेसेज थांबले होते. गेल्या महिन्यात पुन्हा अश्लील मेसेज व्हायरल झाल्याने तरुणीने फिर्याद दिली.  पोलिसांनी मेसेज व्हायरल करणारी इन्स्टाग्राम खाती तपासली. त्यावरून एका सेंट्रिंग कामगाराकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, त्याचे इन्स्टा अकाऊंट प्रथमेश ऊर्फ सोन्या पाटील हा चालवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संबंधित तरुणी इतर तरुणांशी बोलत असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Web Title: She is defamed on 'Insta' for talking to others in kolhapur