शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोमवारी दुष्काळग्रस्तांच्या मुखात अन्न

By admin | Updated: September 1, 2015 00:26 IST

हिंदू युवा प्रतिष्ठानचे दातृत्व : पाहुणचाराने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत

कोल्हापूर : दुष्काळाने होरपळणाऱ्या औरंंगाबाद जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त कुटुंबांना श्रावण सोमवारी जेवण देऊन हिंदू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत उपवास सोडला. त्यांच्या दातृत्वाने या कुटुंबांचा ऊर भरून आला. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण, वाळुंज, आदी भागातील दुष्काळग्रस्त कुटुंबे व्यवसाय व पोटापाण्याच्या निमित्ताने कोल्हापुरात आली आहेत. सध्या जिल्ह्यात चोरांच्या अफवेचे पेव फुटले आहे. त्यामुळे व्यवसायाने लोहार असणाऱ्या या समाजाचे ग्रामीण भागात फिरणे मुश्कील झाले आहे. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे या कुटुंबांनी रंकाळा परिसरातील राज कपूर पुतळ्यासमोरील उद्यानाशेजारी वास्तव्य केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही कुटुंबं इथे आहेत. शेती अवजारे व लोहार काम करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. भटकंती नसल्याने व्यवसायावर परिणाम होऊन प्रसंगी अर्धपोटी रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे दु:ख हलके करून त्यांना आधार देण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानने रंकाळा येथील उद्यानात या कुटुंबीयांसमवेत श्रावण सोमवारचा उपवास सोडण्याचा उपक्रम राबविला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळग्रस्त सात कुटुंबांसमवेत दुपारी श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यात आला. यावेळी संजय ढाले, महादेव कुकडे, ज्ञानदेव पुंगावकर, महेश इंगवले, रामभाऊ लगारे, समीर वर्णे, अशोक साळोखे, माधव कुंभोजकर, रामदास पडूळकर, भानुदास पडूळकर, गुलाबराव पडूळकर उपस्थित होते.हे आपलेच बांधव आहेत. त्यांच्यावर दुष्काळाचे संकट आल्याने ते इथे आले आहेत. त्यांना आधाराची गरज आहे. त्यांना पोटभर अन्न मिळावे, यासाठी आम्ही श्रावण सोमवारी त्यांना गोडधोड अन्न खायला घालून त्यांच्यासोबत उपवास सोडला व त्यांना आधार देण्याचे काम केले. आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना ओळखपत्र देण्यासाठी लवकरच पोलीस प्रशासनाला भेटणार आहोत. -अशोक देसाई, अध्यक्ष, हिंदू युवा प्रतिष्ठान