कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिंदेसेनेत दाखल झालेले शारंगधर देशमुख यांनी प्रभाग क्रामांक नऊमधून विजय खेचून आणला. तब्बल तीन हजार मतांनी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव केला. त्यांना रोखण्यासाठी कांँग्रेसच्या नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. देशमुख यांचा विजय काँग्रेससाठी मोठा झटका आहे.कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि त्याचेच जुने सहकारी राहुल माने यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती. देशमुख हे आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शिंदे सेनेत दाखल झाल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने व्यूव्हरचना आणखी होती. मात्र, त्यांनी तब्बल तीन हजारांचे मताधिक्य घेऊन काँग्रेसचे उमेदवार राहुल माने याचा पराभव केला. देशमुखांच्या प्रयत्नांमुळे शिंदेसेना आणि महायुतीला मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे.दरम्यान, कोल्हापुरात काँग्रेसची पिछेहाट होत असून महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. कसबा बावडा, रुईकर कॉलनीसह पेठांमध्येही भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Web Summary : Sharangdhar Deshmukh, who joined the Shinde Sena, defeated Congress' Rahul Mane by a significant margin in Kolhapur. His victory, a blow to Satej Patil, signals a shift towards the Mahayuti alliance as Congress faces setbacks in key areas.
Web Summary : शिंदे सेना में शामिल हुए शारंगधर देशमुख ने कोल्हापुर में कांग्रेस के राहुल माने को हराया। सतेज पाटिल के लिए यह हार एक झटका है, जो महायुति गठबंधन की ओर बदलाव का संकेत देती है क्योंकि कांग्रेस को अहम क्षेत्रों में नुकसान हुआ है।