शरद पवारांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागेल - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:05 AM2019-03-04T05:05:05+5:302019-03-04T05:05:23+5:30

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा होती. तरीही त्यांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे;

Sharad Pawar will have to lose for the first time in history - Chandrakant Patil | शरद पवारांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागेल - चंद्रकांत पाटील

शरद पवारांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागेल - चंद्रकांत पाटील

googlenewsNext

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा होती. तरीही त्यांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्यांना इतिहासात पहिल्यांदाच हरावे लागणार आहे, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे वर्तविले.
आपण शिवसेना-भाजपा युतीशी कधीही प्रतारणा केली नसून, यापुढेही करणार नाही. त्यामुळे कोणीही शंका बाळगू नये, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. माझे व उद्धव ठाकरे यांचे गेल्या ३५ वर्षांपासून घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील होतो. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही काँग्रेससोबत जाण्याचा विचार करू शकले नसते. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब झाले. अनेकांकडून युती होणार नाही असे छातीठोकपणे सांगितले जात होते; परंतु युतीबाबत आपण पहिल्यापासून निश्चिंत होतो.
>माढा, बारामतीसह सर्वच जागा जिंकू
भाजप-शिवसेना ४३ नव्हे तर सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकेल. यामध्ये शरद पवारांचा माढा मतदार संघ व बारामती मतदार संघही असेल, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar will have to lose for the first time in history - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.