शरद पवार हे वादळे अंगावर घेणारे नेते : ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील

By विश्वास पाटील | Updated: July 2, 2023 20:57 IST2023-07-02T20:41:50+5:302023-07-02T20:57:03+5:30

सरोज पाटील या शरद पवारांच्या भगिनी आणि दिवंगत नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत.

Sharad Pawar is a leader who takes on storms: Elder sister Saroj Patil | शरद पवार हे वादळे अंगावर घेणारे नेते : ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील

शरद पवार हे वादळे अंगावर घेणारे नेते : ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील

कोल्हापूर : माझे बंधू शरद पवार हे वादळे अंगावर घेणारे आहेत. ते खचून जाणार नाही. कोणतेही नवीन आव्हान आले की त्यांना फार जोर चढतो आणि नवे वादळही तो परतवून लावील, असा विश्र्वास त्यांच्या मोठ्या भगिनी सरोज पाटील यांनी व्यक्त केला. सरोज पाटील या ज्येष्ठ दिवंगत नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत.

राज्यातील ताज्या घडामोडीनंतर त्या म्हणाल्या, शरद पवार यांनी पक्षातील सर्वांना सत्तेची संधी दिली. नवे नेतृत्व तयार केले. परंतु, ज्यांनी त्यांच्यामुळे सत्ता भोगली, त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. लोक आजही शरद पवार यांच्या बाजूने आहेत. त्यांना या वयात लढावे लागते याचेच वाईट वाटते. सध्याचा काळ सर्वांनी एकत्रित येऊन भाजपला रोखण्याचा आहे.

हा पक्ष समाजात, माणसामाणसांत दुहीचे विष पेरून राजकारण करू लागला आहे. त्यांनी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीत तेच केले. परंतु, लोक शहाणे आहेत. तेच याला नक्की उत्तर देतील असा विश्र्वासही सरोज पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Sharad Pawar is a leader who takes on storms: Elder sister Saroj Patil