शामराव तथा एस वाय पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:18+5:302021-05-23T04:24:18+5:30

कोपार्डे : चिचंवडे तर्फ कळे येथे रहिवासी , पेन्शनर संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव यशवंत तथा एस. वाय. पाटील (वय ...

Shamrao and SY Patil passed away | शामराव तथा एस वाय पाटील यांचे निधन

शामराव तथा एस वाय पाटील यांचे निधन

कोपार्डे : चिचंवडे तर्फ कळे येथे रहिवासी , पेन्शनर संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव यशवंत तथा एस. वाय. पाटील (वय ८२ ) यांचे निधन झाले. खासगी व सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नासाठी एस. वाय. पाटील यानी कुंभी कासारी पेन्शनर संघटनेची स्थापना करून पेन्शन वाढीसाठी पहिला लढा त्यांनी सुरू केला.

कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटना, राष्ट्रीय पातळीवरील निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीच्या माध्यमातून पेन्शन वाढीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या लढ्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. कुंभी - कासारी सह साखर कारखान्यातून ते केनयार्ड सुपरवायझर म्हणून सेवा निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर देखील कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

२२ एस. वाय. पाटील निधन

Web Title: Shamrao and SY Patil passed away