शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway: 'प्रसंगी नेत्यांशी दोन हात करायला शेतकरी मागेपुढे पाहणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:01 IST

''आम्हाला पैसे कसले देता, याउलट तुम्हीच रद्द करण्यासाठी किती पैसे घेता ? ते बोला''

शिवाजी सावंतगारगोटी: शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास प्रसंगी नेत्यांशी दोन हात करायला इथला शेतकरी मागेपुढे पाहणार नाही असा गर्भित इशारा कॉ.सम्राट मोरे यांनी दिला. ते गारगोटी येथील क्रांती चौकात आज, बुधवारी आयोजित केलेल्या आत्मक्लेश आंदोलनात बोलत होते. यावेळी विजय देवणे, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, राहुल देसाई, कॉ. संपत देसाई आदी. उपस्थितीत होते.नागपूर गोवा महामार्गाच्या विरोधात  शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने भुदरगड येथील महामार्ग बाधीत शेतकरी उपस्थित होते.आत्मक्लेश आंदोलनाचे संयोजन कॉ. सम्राट मोरे, सरपंच सर्जेराव देसाई यांनी केले होते. उबाठाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांचा समाचार घेतला. आपले घर सांभाळण्याचा सल्ला दिला. 

तुम्हीच रद्द करण्यासाठी किती पैसे घेता ? ते बोला!माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, आम्हाला पैसे कसले देता, याउलट तुम्हीच रद्द करण्यासाठी किती पैसे घेता ? ते बोला!. माजी आमदार केपी पाटील महामार्गाच्या समर्थकांचा बोलविता धनी कोण आहे? हे तपासावे लागेल. कोणत्या लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा दिला आहे ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करावे असे आवाहन केले. 

शेतकऱ्यांची आत्मबलिदानाची तयारीयुवक नेते राहुल देसाई यांनी शक्तीपीठ महामार्ग भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचे सांगितले. याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला. कॉ.संपत देसाई यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी प्रसंगी आत्मबलिदानाची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे सांगितले. कॉ.शिवाजीराव मगदूम यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्यांचा आक्रमकपणे समाचार घेतला.या आंदोलनाला आनंदा पाटील, उदय देसाई, मायकल बारदेसकर, राजेंद्र देसाई, राजू चौगुले, अभिजीत पाटील, सरपंच मदन पाटील, सरपंच बापूसो आरडे, सरपंच ऋषिकेश पाटील, सरपंच प्रकाश वास्कर, जालिंदर कांबळे, शशिकांत वाघरे यांच्यासह शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnagpurनागपूरgoaगोवाhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन