Shahupuri police seized four forts of cannabis | शाहूपुरी पोलिसांनी पकडला चार किलाे गांजा

शाहूपुरी पोलिसांनी पकडला चार किलाे गांजा

ठळक मुद्देशाहूपुरी पोलिसांनी पकडला चार किलाे गांजामोबाईल, रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : कऱ्हाड येथून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणण्यात येणारा चार किलो गांजा शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून मोबाईल, रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

रिक्षाचालक रमजान नूरमहंमद सुतार (वय ४७, रा. मणेरमळा), रोहित राम चव्‍हाण (३०, घिसाड गल्‍ली, सोमवार पेठ) आणि हर्षल मनोज नार्वेकर (१९, रेल्‍वे स्‍टेशन परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कऱ्हाड येथून कोल्हापूरला रिक्षातून गांजा आणण्‍यात येत असल्‍याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्‍याचे निरीक्षक श्रीकृष्‍ण कटकधोंड यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री तावडे हॉटेल परिसरात सापळा रचला. त्याव्दारे संशयित रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये ४ किलो ९४ ग्रॅम गांजा सापडला. अटक केलेल्या तिघा संशयिताचे मोबाईल, रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला.

 

Web Title: Shahupuri police seized four forts of cannabis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.