शाहूपुरी पोलिसांनी पकडला चार किलाे गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 11:55 IST2021-04-15T04:24:31+5:302021-04-15T11:55:14+5:30
Crimenews Kolhapur: कऱ्हाड येथून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणण्यात येणारा चार किलो गांजा शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून मोबाईल, रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

शाहूपुरी पोलिसांनी पकडला चार किलाे गांजा
कोल्हापूर : कऱ्हाड येथून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणण्यात येणारा चार किलो गांजा शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून मोबाईल, रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
रिक्षाचालक रमजान नूरमहंमद सुतार (वय ४७, रा. मणेरमळा), रोहित राम चव्हाण (३०, घिसाड गल्ली, सोमवार पेठ) आणि हर्षल मनोज नार्वेकर (१९, रेल्वे स्टेशन परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कऱ्हाड येथून कोल्हापूरला रिक्षातून गांजा आणण्यात येत असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री तावडे हॉटेल परिसरात सापळा रचला. त्याव्दारे संशयित रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये ४ किलो ९४ ग्रॅम गांजा सापडला. अटक केलेल्या तिघा संशयिताचे मोबाईल, रिक्षासह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.