शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

शाहू विचारांत समाजाला पुढे नेण्याची प्रेरणा - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 5:53 AM

हातातील सत्ता आपली नाही तर ती रयतेसाठी आहे. हे सूत्र घेऊन काम करणारा राजा म्हणून राजर्षि शाहू यांची ओळख संपूर्ण देशात झाली. त्यांचे कर्तृत्व दक्षिणेत, उत्तरेत पाहायला मिळते, घराघरांत शाहूंच्या कर्तृत्वाचा अभिमान पाहायला मिळतो, असे पवार म्हणाले.

कोल्हापूर : सर्वांगीण विकासासाठी केवळ विचार आणि दृष्टी असून उपयोगाची नाही तर प्रत्यक्षात विचारांना अनुसरून कृती करायला पाहिजे. हे जाणणारा द्रष्टा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक नव्या पिढीला आधुनिकतेचा, समतेचा विचार देईल, लोकशाहीचे महत्त्व पटवून देईल आणि विकासाच्या वेगवेगळ््या भूमिका स्वीकारून पुढे कसे जायचे आणि यशस्वी कसे व्हायचे, यादृष्टीने प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे बोलताना केले.कोल्हापूर महानगरपालिकेने स्वनिधीतून पावणेतीन कोटी रुपये खर्चून येथील नर्सरी बागेत बांधलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक लोकार्पण सोहळ््यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे आदी उपस्थित होते.देशात राजे अनेक होऊन गेले, संस्थाने अनेक होऊन गेली. परंतु समाजाचे सत्व जागे करून उपेक्षित, शोषित, पीडित समाजाला संघटित करून राज्य प्रस्थापित करण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी केली. हातातील सत्ता आपली नाही तर ती रयतेसाठी आहे. हे सूत्र घेऊन काम करणारा राजा म्हणून राजर्षि शाहू यांची ओळख संपूर्ण देशात झाली. त्यांचे कर्तृत्व दक्षिणेत, उत्तरेत पाहायला मिळते, घराघरांतशाहूंच्या कर्तृत्वाचा अभिमान पाहायला मिळतो, असेही पवार म्हणाले.कोल्हापूर गादीवर दत्तक आल्यापासून मृत्यूपर्यंत शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याचे उदाहरणांसह अनेक घटनांचे वर्णन करून पवार यांनी कोल्हापूरकरांना चकीत तर केलेच शिवाय आपल्या अफाट स्मरणशक्तीची जाणीव देखील करून दिली.दुसरा टप्पा सुरु करामहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या टप्प्यातील कामाला आतापासूनच सुरुवात करा. समाधी स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो कार्यक्रम मुंबईत घेऊ. शाहूंच्या विचाराचा संदेश जगात गेला पाहिजे, असे सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार