शाहू माने, अभिज्ञा पाटीलसह सातजण क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:16+5:302021-02-05T06:57:16+5:30

कोल्हापूर : राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने, अभिज्ञा पाटील हिच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा ...

Shahu Mane, Abhijna Patil and seven other sports awardees | शाहू माने, अभिज्ञा पाटीलसह सातजण क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

शाहू माने, अभिज्ञा पाटीलसह सातजण क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

कोल्हापूर : राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने, अभिज्ञा पाटील हिच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण प्रजासत्ताकदिनी आज, मंगळवारी (दि. २६) सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते होणार आहे.

जिल्ह्यातील अमित अशोक शिंत्रे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, तर नेमबाजी क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल शाहू तुषार माने, अभिज्ञा अशोक पाटील, रसिका अर्जुन शिरगावे (सॉफ्टबॉल ) यांना थेट कामगिरीवर जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले. गुणवंत खेळाडू म्हणून हर्षवर्धन सतीश भोसले (मैदानी क्रीडा प्रकार), ज्योती अरुण सुतार (तलवारबाजी) यांची निवड झाली. दिव्यांग खेळाडू अभिषेक बाबासाहेब जाधव (जलतरण) यांचा दिव्यांग गुणवंत खेळाडू म्हणून गौरव केला जाणार आहे. पुरस्कारासाठी ३२ प्रस्ताव सादर झाले होते. रोख दहा हजार रुपये व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.

फोटो (२५०१२०२०-कोल-जिल्हा क्रीडा पुरस्कार)

Web Title: Shahu Mane, Abhijna Patil and seven other sports awardees