Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:47 IST2025-08-06T12:46:59+5:302025-08-06T12:47:29+5:30

अध्यक्ष, संचालक, कर्जदारांसह दहाजणांवर गुन्हा : गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

Seven crores embezzled from Dutt Government Credit Society Jaysingpur Kolhapur | Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार

Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : कर्जदारांना संस्थेच्या निधीचे नियमबाह्य कर्ज वाटप करून ७ कोटी ५६ लाख ५६ हजार ११७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येथील श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक व शाखाधिकाऱ्यांसह कर्जदारांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संस्थेच्या शिल्लक रकमेचा स्वत:साठी वापर करून आरोपींनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी लेखापरीक्षक सुभाष दादासाहेब देशमुख (रा. शिरोळ) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार महादेव तराळ (रा. जयसिंगपूर), संचालक प्रमोद मनोहर जाधव (रा. जयसिंगपूर), बाळासोा दत्तू लोहार (रा. अतिग्रे), संचालिका रेखा महादेव तराळ (रा. हेरवाड), कर्जदार अनिल बाळासोा घोलप (रा. हेरवाड), कर्जदार रावसाहेब भूपाल कोळी (रा. जयसिंगपूर), कर्जदार वैशाली अनिलकुमार तराळ (रा. जयसिंगपूर), कर्जदार मृत महादेव भाऊ तराळ (रा. हेरवाड), व्यवस्थापक राजीव गणपत कोळी (रा. चिपरी) व शाखाधिकारी इंद्रजित महादेव जाधव (रा. उदगाव) अशी आरोपींची नावे असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.

येथील क्रांती चौकानजीक ही पतसंस्था असून, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील व्यवहाराचे लेखापरीक्षण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, शाखाधिकारी यांनी ३० नोव्हेंबर २०१४ ते २० मार्च २०२५ या कालावधीत कर्जदारांना नियमबाह्य निधीचे वाटप केले. शिवाय नियमबाह्य गुंतवणूक करून शिल्लक रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून फेरलेखापरीक्षणानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Seven crores embezzled from Dutt Government Credit Society Jaysingpur Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.