संभाजीनगरातून सात सेंद्रिय खताची पोती लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:09+5:302021-06-19T04:16:09+5:30

कोल्हापूर : संभाजीनगरातील निर्माण चौक, मैल खड्डा परिसरातील एका सेंद्रिय खतनिर्मिती कारखान्याच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने खताची सात पोती ...

Seven bags of organic manure from Sambhajinagar | संभाजीनगरातून सात सेंद्रिय खताची पोती लंपास

संभाजीनगरातून सात सेंद्रिय खताची पोती लंपास

Next

कोल्हापूर : संभाजीनगरातील निर्माण चौक, मैल खड्डा परिसरातील एका सेंद्रिय खतनिर्मिती कारखान्याच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने खताची सात पोती चोरून नेली. याबाबतची फिर्याद प्रसाद मारुती शिंदे (वय २७, रा. हिरा कुंभार चाळ, कुर्ला (पश्चिम), सध्या रा. कृष्णा काॅलनी, संभाजीनगर) यांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निर्माण चौक, मैल खड्डा येथे एकटी संस्थेचे सेंद्रिय खत निर्मितीचा कारखाना आहे. येथे प्रकल्प समन्वयक म्हणून फिर्यादी शिंदे हे काम पाहत आहे. त्यांच्या निरीक्षणाखाली सुरू असलेल्या या कारखान्यात बुधवारी (दि. १६) रात्री आठ ते गुरुवारी (दि. १७) सकाळी दहा वाजेपर्यंतच्या या कालावधीत अज्ञात चोरट्याने एकूण १० हजार ५०० रुपये किमतीची प्रत्येकी ५० किलो वजनाची सात पोती चोरून नेली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला असून, तपास अंमलदार गडकरी करीत आहेत.

Web Title: Seven bags of organic manure from Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.