शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

समितीची अबू्र चव्हाट्यावर काढणाऱ्यांना घरी बसवा

By admin | Updated: July 9, 2015 00:50 IST

चंद्रदीप नरके : पंधरा वर्षांत शौचालय बांधू न शकणाऱ्यांची नैतिकता काय?

राजाराम लोंढे - कोल्हापूर -पंधरा वर्षे सत्ता उपभोगूनही बाजार समितीमध्ये ज्यांना शौचालये बांधता आली नाहीत, तीच मंडळी पुन्हा पैशाच्या जोरावर सत्तेची स्वप्ने बघत आहेत. भ्रष्टाचाराने समितीची अबू्र चव्हाट्यावर काढणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहन ‘शिव-शाहू परिवर्तन’ पॅनेलचे नेते आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. भ्रष्टाचारी कारभाराची कबुली द्यायची आणि माफ करा म्हणणाऱ्यांना मते मागण्याची नैतिकता नसल्याचा टोलाही त्यांनी दोन्ही कॉँग्रेस आघाडीला हाणला. कॉँग्रेस व त्यानंतर दहा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडीची सत्ता बाजार समितीवर होती; पण दुर्दैवाने समितीमध्ये पायाभूत सुविधाही या मंडळींनी केल्या नाहीत. सत्तेच्या राजकारणात दोघांनी एकमेकांना सहकार्य करायचे आणि विरोधात गेले की आम्हाला फसविले म्हणून सांगण्याचा उद्योग या मंडळींनी केला; पण खऱ्या अर्थाने दोन्ही कॉँग्रेसनेच समितीच्या शेतकरी, व्यापारी व अडत्यांना फसविल्याचा आरोप आमदार नरके यांनी केला. कॉँग्रेसची सत्ता असताना विक्रमनगर येथील २३ एकर जमीन विकली. शाहू सांस्कृतिक मंदिर भाडेतत्त्वावर देताना कोणी हात मारला? या सर्व गोष्टींतील घोटाळा राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी सत्तेवर आल्यावर उघड केला. त्यांचा घोटाळा कमी पडला की काय म्हणून राष्ट्रवादीच्या मंडळींनी बाजार समितीतील एकही बोळ शिल्लक ठेवला नाही. जमेल तसा घोटाळा करण्याचा उद्योग या दोन्ही कॉँग्रेसच्या मंडळींनी केला आहे. चुकीचा कारभार केला म्हणून तत्कालीन संचालकांना वगळल्याचे सांगत एकप्रकारे ही मंडळी भ्रष्टाचाराची कबुलीच देत आहेत. संस्थात्मक संख्येच्या ताकदीवर मतदारांना गृहीत धरायचे आणि राजकारणात पाहिजे तसे वाकविण्याचे काम दोन्ही कॉँग्रेसने केले आहे. दोघांचा कारभार संबंधित घटकाने जवळून बघितला आहे. त्यामुळे अशी प्रवृत्ती समितीत पुन्हा घुसू देऊ नका, असे आवाहन करीत बाजार समिती नावारूपास आणण्यासाठी आगामी पाच वर्षांत ‘१२ कलमी जाहीरनामा’ घेऊन आम्ही मतदारांसमोर जात असल्याचेही आमदार नरके यांनी सांगितले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी तिरंगी लढत होत असून, रविवारी मतदान होत आहे. तिन्ही पॅनेलची भूमिका काय, कोणता जाहीरनामा घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत, याबाबत पॅनेलप्रमुखांशी केलेला संवाद आजपासून...सत्ता द्या, हे करतो...!बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा देणार शेतकऱ्यांची सोय व्हावी व समितीच्या उत्पन्नवाढीसाठी टेंबलाईवाडी, कागल, मलकापूर येथे उपबाजार सुरू करणारकोल्हापुरी गुळाला ‘एक्स्पोर्ट झोन’ची मान्यता मिळवून देणार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बसून आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना भाजीपाला, गूळ, फळांचे दर समजतील, अशी व्यवस्था करणार. ामितीत शेतकऱ्यांना निवासाची व अल्प दरात भोजनाची व्यवस्था गुळाला किमान हमीभाव देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्नगुऱ्हाळघरे अद्ययावत करून निर्यातक्षम गूळनिर्मितीला प्रोत्साहन देणार शेतकरी-अडते-व्यापारी यांच्यातील वाद टाळण्यासाठी ‘आदर्श आचार संहिता’ तयार करणारकळे (ता. पन्हाळा) येथे बांबूचा उपबाजार सुरू करणार दर महिन्याला कार्यक्षेत्रातील विकास संस्था, ग्रामपंचायतीचे सदस्य, व्यापारी, अडते, हमाल-तोलाईदार यांची बैठक घेऊन समस्या निराकरण करणारवारेमाप खर्चावर नियंत्रण ठेवून प्रशासनावर अंकुश ठेवू.