शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोज पाहतो मरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत भयानक व वेदनादायी आहे. गेल्या चार दिवसांत या संसर्गामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत भयानक व वेदनादायी आहे. गेल्या चार दिवसांत या संसर्गामुळे ८५, तर दोन महिन्यांत २६० जणांवर अग्निसंस्कार करण्याचा प्रसंग पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर आला आहे. तीन प्रहरात २० कर्मचारी जिवावर उदार होऊन कर्तव्याला पहिले प्राधान्य देत, हे अंत्यसंस्काराचे काम करीत आहेत.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने देशभरात पसरत आहे. त्यात कोल्हापुरातही हा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत २६० कोरोनाग्रस्त मृतांवर पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी अग्निसंस्कार केले आहेत. गेल्या चार दिवसांत तर मोठी भयाण स्थिती येथे आहे. तीन प्रहरात ८ - ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकूण ८५ कोरोनाग्रस्तांवर, तर इतर व्याधींनी मृत झालेले २५, अशा एकूण ११० जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. प्रत्येक कर्मचारी पीपीई कीट घालून, सॅनिटायझरचा वापर करून हे कार्य करीत आहे. अनेकांच्या अंत्यसंस्काराला एक किंवा दोन नातेवाईकच हजर असतात. अशावेळी त्या मृताचे नातेवाईक होऊन सर्व सोपस्कारही हे कर्मचारीच पूर्ण करतात. दिवसभरात हे कीट घातल्यामुळे अंगाची लाहीलाही होते आणि वरून उन्हाच्या तीव्र झळा. अशा परिस्थितीत आलेल्या कोरोना मृतावर एक मण लाकूड व साडेचारशे शेणी हे कर्मचारी रचतात. त्यानंतर स्वत:च कापूर घेऊन त्यावर आपलाच नातेवाईक असल्याप्रमाणे मृताला संसारी मोहातून सुटका मिळावी, म्हणून ‘हराटी मंत्र’ म्हणून अग्निसंस्कार करतात.

एकही बाधित नाही

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पीपीई कीट, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार केल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याला अद्यापही कोरोना संसर्ग झालेला नाही. एक कोरोनाग्रस्त मृत आल्यानंतर पूर्णपणे प्लास्टिकने मृतदेह झाकलेला असतो. तरीसुद्धा काळजीपोटी कर्मचारी पीपीई कीट घालूनच तो मृतदेह रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर शेणी, कापूर लावून दहन करतात. दहन झाल्यानंतर सॅनिटायझरने सर्व शरीराची स्वच्छता करतात. प्रत्येकाच्या तोंडाला एन-९५ मास्क सक्तीचा आहे.

येथील कोरोना योद्धे असे...

अरविंद कांबळे (आरोग्य निरीक्षक), बाबासाहेब भोसले, सुनील कांबळे, तुळसीदास कांबळे, प्रदीप बानागे, अनिल चौगले, विलास कांबळे, करण बानागे, विल्सन दाभाडे, हिंदुराव सातपुते, अशोक गवळी, रवी कांबळे, जयदीप कांबळे, वैभव लिगडे, प्रसाद सरनाईक, अमोल कांबळे, आशिष बानागे, राजू कांबळे यांचा समावेश आहे.

दृष्टिक्षेप...

एकूण दहन बेडची संख्या - ४७

कोरोना मृतांसाठी राखीव - २७ बेड

नाॅन कोविड मृतांसाठी राखीव - २०

कर्मचारी संख्या - २०

कामाच्या वेळा : २४ तास, तीन प्रहरात

गॅसदाहिनी - १

दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - २६०

गेल्या चार दिवसांत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - ८५

कोट

पीपीई कीट, सॅनिटायझरचा पुरेपूर वापर करून कोरोनाग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार करतात. एकही कर्मचारी कोरोनाने बाधित नाही. तीन प्रहरात अखंडपणे २४ तास काम सुरू आहे.

- अरविंद कांबळे , आरोग्य निरीक्षक