शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सीमा पाटील बांधकाम सभापती

By admin | Updated: October 8, 2014 00:30 IST

जिल्हा परिषद सभापती निवड : अभिजित तायशेटे, किरण कांबळे, ज्योती पाटील यांनाही संधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद सभापतिपदांच्या निवडी आज बिनविरोध झाल्या. शिक्षण सभापतिपदी काँग्रेसचे अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापतिपदी किरण कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी ज्योती दीपक पाटील यांची, तर बांधकाम सभापतिपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सीमा विजय पाटील यांची निवड झाली. काँग्रेस कमिटीत पक्षनिरीक्षक आमदार रामहरी रूपनवार यांनी सकाळी अकराला सभापतिपदांच्या नावाची घोषणा केली. तत्पूर्वी, एका हॉटेलमध्ये रूपनवार यांच्यासह पी. एन. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे यांची बैठक झाली. यामध्ये नावे निश्चित झाली. विकास कांबळे यांना समाजकल्याण सभापतिपद मिळावे, यासाठी आमदार सा. रे. पाटील यांनी, तर किरण कांबळे यांच्यासाठी प्रकाश आवाडे आग्रही होते. महिला बालकल्याण सभापतिपद प्रमोदिनी जाधव यांना देण्यासाठी आवळे यांनी ताकद लावली होती. दुपारी तीन वाजता शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा झाली. आवाडे-आवळे यांचे एकमत होत किरण कांबळे (हुपरी) यांनी बाजी मारली. महिला व बालकल्याण सभापतिपदी ज्योती पाटील (हलकर्णी) यांची, तर बांधकाम सभापतिपदी सीमा पाटील (अकिवाट) यांची निवड झाली. यावेळी आमदार सा. रे. पाटील, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रकाश सातपुते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजिवनीदेवी गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, उमेश आपटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)काँग्रेस अडचणीत आहे, समजून घ्याअध्यक्ष, उपाध्यक्षपदाप्रमाणे विषय समिती सभापती निवडीसाठी नेत्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे नावे जाहीर केल्यानंतर नाराजी होणार हे उघड होते. त्यामुळे निरीक्षक रूपनवार यांनी सध्या काँग्रेस अडचणीत आहे, नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे, काही झाले तरी सव्वा वर्षासाठीच निवडी असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.