कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:57 IST2025-05-10T13:56:54+5:302025-05-10T13:57:49+5:30
कोल्हापूर : ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ ...

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर शस्त्रधारी पोलिस तैनात केले आहेत.
देशातील धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्तात वाढ केली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. दिवसा आणि रात्री चार वेळा पेट्रोलिंग केले जात आहे, तसेच मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर विशेष पोलिस दलाचे शस्त्रधारी कर्मचारी तैनात केले आहेत.
वाचा - ...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.