शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचा सचिव लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: December 9, 2014 23:26 IST

कारवाई करूनचदिवस साजरा:रंगेहात पकडले : ५० हजारांची केली होती मागणी

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव रघुनाथ वामन मनवे यास आज, मंगळवारी लाचलुचपत विभागाने गाळ्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. एका ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. मनवे यांनी यापूर्वी या तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेतले असून, दुसऱ्या टप्प्यांत ३0 हजार रुपये घेताना तो जाळ्यात अडकला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात सहकार क्षेत्रात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. तक्रारदाराचा सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाडेपट्ट्यावर गाळा होता. बाजार समितीने आता तेथे नवीन व्यापारी संकुल बांधले आहे. तेथे तक्रारदाराला गाळा दिला होता. त्यामुळे भाडेपट्टा गाळ्याची ‘अलॉटमेंट’ करण्यासाठी केलेल्या मदतीचा भाग म्हणून सचिन रघुनाथ मनवे (वय ४९, रा. मनवेवाडी, पो. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) याने तक्रारदाराकडे ५0 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने मनवे यास नाइलाजास्तव २0 हजार रुपये दिले होते.मात्र, या नगरपरिषदेत तक्रारदार व त्यांच्या मुलीचे नाव भोगवटादार म्हणून लावण्यासाठी बाजार समितीचा ना हरकत दाखला लागणार होता. त्यासाठी तक्रारदाराने ३0 हजार रुपये द्यावेत म्हणून मनवेने तगादा लावला होता. यामुळे तक्रारदाराने ४ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली.या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. मनवे याने तक्रारदाराला आज, मंगळवारी सायंकाळी चार वाजता त्याच्या कार्यालयात पैसे घेऊन बोलावले. तक्रारदार मनवेच्या दालनात पैसे घेऊन गेला आणि ते घेत असतानाच तो रंगेहात पकडला गेला. (प्रतिनिधी) मनवेवाडी येथील घराची झडतीरघुनाथ मनवे मूळचा सातारा तालुक्यातील मनवेवाडी येथील असून, तेथे त्याचे घर आहे. साताऱ्यात शाहूपुरी परिसरात त्याचा ‘शिवराज’ बंगला आहे. मनवेस ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मनवेवाडी येथील घराची आणि शिवराज बंगल्याची झाडाझडती घेत होते. तेथे काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, ‘शिवराज’ बंगल्याला मात्र कुलूप होते. कारवाई करूनच  दिवस साजरादरवर्षी ९ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन’ म्हणून साजरा केला जातो. नेमके याच दिनाचे औचित्य साधून सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन’ साजरा केला.