सत्यजित पाटील आज उदय सामंत यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST2021-06-16T04:31:32+5:302021-06-16T04:31:32+5:30

कोल्हापूर : शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील हे बुधवारी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. ...

Satyajit Patil will meet Uday Samant today | सत्यजित पाटील आज उदय सामंत यांना भेटणार

सत्यजित पाटील आज उदय सामंत यांना भेटणार

कोल्हापूर : शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील हे बुधवारी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. या बैठकीतच जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत तीनही सभापतींचे राजीनामे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाची मोहीम वेगावली आहे. शिवसेनेच्या तीनपैकी दोन सभापती राजीनाम्यासाठी तयार आहेत. परंतु माजी आमदार सत्यजित पाटील यांची भूमिका अजूनही स्पष्ट नसल्याने हंबीरराव पाटील यांचा अजूनही राजीनामा झालेला नाही.

या आधी सामंत आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी घेतलेल्या दोन्ही बैठकांना सत्यजित पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या अडचणी आता ते मुंबईत सामंत यांच्याशी चर्चेवेळी मांडणार आहेत.

Web Title: Satyajit Patil will meet Uday Samant today