Kolhapur-Local Body Election: पन्हाळा नगरपरिषदेत सतीश भोसलेंची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:08 IST2025-11-19T16:07:43+5:302025-11-19T16:08:30+5:30
Local Body Election: जनसुराज्य पक्षाकडून नगरपरिषद बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान

Kolhapur-Local Body Election: पन्हाळा नगरपरिषदेत सतीश भोसलेंची बिनविरोध निवड
पन्हाळा: पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत बिनविरोध होण्याचा पहिला मान शिवशाहु आघाडीचे सर्वेसर्वा सतीश कमलाकर भोसले यांना मिळाला. त्यांनी जनसुराज्य पक्षाबरोबर युती केली आहे.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण गटातून सतीश भोसले निवडणूक रिंगणात होते. सतीश भोसलेंच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू अशोक, तानाजी भोसले व गजानन कोळी यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने सतीश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. सतीश भोसले हे यापुर्वीही नगरसेवक म्हणून २००४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.
वाचा: कागलात मुश्रीफ-घाटगेंची युती झाली, मुश्रीफांची सुनबाई बिनविरोध निवडून आली
दरम्यान जनसुराज्य पक्षाकडून पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी बहुतेक उमेदवार नाॅट रिचेबल राहीले तर बहुतेक जण परगांवी गेले आहेत