सतेज पाटील विशेष विमानाने हिंगोलीला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:25+5:302021-05-17T04:24:25+5:30

कोल्हापूर : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या हिंगोली येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे ...

Satej Patil left for Hingoli by special plane | सतेज पाटील विशेष विमानाने हिंगोलीला रवाना

सतेज पाटील विशेष विमानाने हिंगोलीला रवाना

कोल्हापूर : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या हिंगोली येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याबरोबर हुबळी येथून विशेष विमानाने रविवारी सायंकाळी रवाना झाले. आज सोमवारी सकाळी हिंगोली येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत.

खासदार राजीव सातव यांचा देशभरातील काँग्रेसच्या अनेक युवक कार्यकर्त्यांशी संपर्क होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. खा. सातव यांच्या निधनाचे वृत्त समजताच दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच .के. पाटील यांच्याशी चर्चा झाल्यावर ते सायंकाळी हुबळीला गेले. तेथून एच के.पाटील यांच्यासोबत विशेष विमानाने नांदेडला गेले.

Web Title: Satej Patil left for Hingoli by special plane