‘गुगल’कडून सातारच्या शिक्षकांचा गौरव

By Admin | Updated: September 5, 2015 23:25 IST2015-09-05T23:23:13+5:302015-09-05T23:25:35+5:30

शिक्षक दिन : डुडलवर ताटपूजे अन् जाधव यांच्या कर्तृत्वाला सलाम

Satara teachers' honor from Google | ‘गुगल’कडून सातारच्या शिक्षकांचा गौरव

‘गुगल’कडून सातारच्या शिक्षकांचा गौरव

सातारा : शिक्षक दिनी यंदा ‘गुगल इंडिया’तर्फे चार शिक्षकांना त्यांच्या तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी अभिवादन करण्यात आले आहे. त्यामध्ये साताऱ्यातील प्रा. दीपक ताटपुजे तसेच म्हसवड येथील बालाजी जाधव या दोन शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षकांसाठी अर्पण केलेल्या डुगलवर आज अख्खी शाळा अवतरली होती.
सातारा येथील प्रा. दीपक ताटपुजे हे गेल्या तीस वर्षांपासून सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्या सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील दीडशे शिक्षकांना ‘आॅनलाईन’ शिक्षण प्रणाली कशी वापरावी, याचे प्रशिक्षण दिले आहे.
म्हसवड येथील बालाजी जाधव हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांना संगणक क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना शिक्षणक्षेत्राला वाहिलेले संकेतस्थळ तयार केले आहे. तसेच दुसरी व चौथीच्या अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकाशिवाय शिकविता यावा, यासाठी अ‍ॅप्स तयार केले आहे. यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. मुलांना कार्टून, क्लिपिंग, स्लाईड शो, झिंगल टूनच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी स्थापन केलेल्या समितीत जाधव हे काम करत असून राज्यभर शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Satara teachers' honor from Google