आपलं गावच भारी!, कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच पाचगावात एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:13 IST2025-02-10T12:09:56+5:302025-02-10T12:13:41+5:30

विश्वासात न घेता हद्दवाढ लादल्यास आंदोलनाचा इशारा

Sarpanchs of 42 villages unite in Pachgaon against Kolhapur boundary expansion | आपलं गावच भारी!, कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच पाचगावात एकवटले

आपलं गावच भारी!, कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच पाचगावात एकवटले

पाचगाव : शहरालगत असणाऱ्या गावांच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य रविवारी पाचगावमध्ये एकवटले. यावेळी हद्दवाढविरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर शहराच्या बकालपणाला जबाबदार कोण? असा लावण्यात आलेला मोठा फलक यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

यावेळी पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले, शहराचा विकास अगोदरच खुंटला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून १५वा वित्त आयोग असेल तसेच २५/१५ वित्त आयाेग असेल याचा शासन स्तरावर पाठपुरावा करून अनेक विकासकामे करता येतात. परंतु महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यास ४२ गावांतील शेती संपुष्टात येईल. याला जबाबदार कोण. त्यामुळे ही हद्दवाढ कदापिही करू देणार नाही. हद्दवाढ लादण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू.

यावेळी उचगावाचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांच्यासह अन्य गावांतील सरपंचांनी आपापली मते मांडली. यावेळी कळंबा, मोरेवाडी, वडणगे, सरनोबतवाडी, बालिंगा, वळिवडे, गांधीनगर, पिरवाडी, कंदलगाव, गडमुडशिंगी, गोकुळ शिरगाव, शिंगणापूर व आंबेवाडी या गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच हद्दवाढविरोधी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

आपलं गावच भारी

शहरातील कचरा, पाणी प्रश्न, रस्ते यासह वाहतूक कोंडी, आरोग्य व्यवस्था यांचा विचार करता ''आपलं गाव भारी ''असे म्हणावे लागेल. हा सूर आज बेचाळीसगावच्या सरपंच बैठकीत उमटला.

Web Title: Sarpanchs of 42 villages unite in Pachgaon against Kolhapur boundary expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.