शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: माजी नगरसेविकेसह पोलिस अधिकारीही ताब्यात!, अन्य दोघांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:58 IST

वकीलपत्र न घेण्याचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे वकिलांना आवाहन

गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन यांच्या आत्महत्याप्रकरणी संशयित आरोपी ‘त्या’ माजी नगरसेविकेसह ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला कर्नाटकातील विजापूर येथून ताब्यात घेतले आहे. संशयित अन्य दोघांच्या शोधासाठी पुणे परिसरात पथके असून, त्यांनाही ताब्यात घेण्यात लवकरच यश येईल, असे पोलिस सूत्रांनी रविवारी (२५) सांगितले.शुक्रवारी (२३) रात्री राहत्या घरातील बेडरूममध्ये उद्योजक शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांनी विष प्राशन व गळे चिरून घेऊन, आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी संतोष आणि तेजस्विनी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि वहीतील मजकूर व फिर्यादीवरून ‘त्या’ नगरसेविकेसह संशयित पोलिस अधिकारी राहुल राऊत यांच्यासह विशाल बाणेकर व संतोष पाटे (रा.पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालावरून पत्नी व मुलगा यांचा विष पाजून, गळा चिरून खून आणि त्यानंतर स्वत: विष प्राशन व गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करीत आहेत.आरोपींचे वकीलपत्र घेऊ नयेदरम्यान, बलात्काराचा खोटा गुन्हा आणि खंडणीची मागणी करून शिंदे, त्यांची पत्नी व मुलास आत्महत्येला प्रवृत्त करून, माणुसकीला काळिमा फासलेल्या आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे गडहिंग्लज ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेली यांना केले आहे.

तीन पोलिस पथके रवानासंतोष शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. त्यासाठी कर्नाटकसह पुणे व सांगली परिसरात मिळून ३ पथके रवाना झाली आहेत. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात लवकरच यश येईल, असे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालावरून पत्नी व मुलगा यांचा विष पाजून, गळा चिरून खून आणि त्यानंतर स्वत: विषप्राशन व गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस