संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:48 IST2020-06-22T15:11:43+5:302020-06-22T16:48:15+5:30

भारतामध्ये जेवढे कोरोनाचे रूग्ण आहेत त्याच्या निम्मे महाराष्ट्रात आहेत. मग राज्यातील परिस्थिती चांगली कशी?

Sanjay Raut will also ask questions to God - Chandrakant Patil's question | संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

ठळक मुद्देसंजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील- चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला मुंबईत रूग्ण्वाहिका नाही, बेडही मिळत नाहीत, परिस्थिती चांगली कशी- चंद्रकांत पाटील यांचा सवाल

कोल्हापूरसंजय राऊत यांनी नरेंदर मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत याबाबत विचारणा केली असता पाटील म्हणाले, संजय राऊत हे ग्रेट संपादक आहेत. ते देव मानतात की नाही माहिती नाही. पण ते देवालाही प्रश्न विचारू शकतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

भारतामध्ये जेवढे कोरोनाचे रूग्ण आहेत त्याच्या निम्मे महाराष्ट्रात आहेत. देशात जेवढे कोरोनाचे बळी आहेत. त्याच्या निम्मे महाराष्ट्रात आहेत. मुंबईत कोरोनाच्या रूग्णांना बेड मिळत नाहीत, रूग्णवाहिकाही मिळत नाही. मग राज्यातील परिस्थिती कशी चांगली आहे असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा या मागणीचे निवेदन पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही, पेरण्या संपत आल्या तरी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज दिलेले नाही. परिस्थिती गंभीर आहे. मात्र या मंत्रीमंडळातील अनुभवी मंत्री आपल्या कामाचा फायदा उद्धव ठाकरे यांना करून देताना दिसत नाहीत.
 

Web Title: Sanjay Raut will also ask questions to God - Chandrakant Patil's question