शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

तोतया अधिकाऱ्याकडून दारू तस्करी; १८ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी; सांगलीतील अधीक्षकांकडून १० जणांचे जबाब पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:01 IST

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करताना सापडलेला तोतया अधिकारी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर ) ...

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करताना सापडलेला तोतया अधिकारी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) याच्या संपर्कातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील १८ कर्मचारी आणि अधिका-यांची चौकशी सुरू झाली. या विभागातील सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या चौकशीतून कर्मचारी आणि अधिका-यांचा दारू तस्करीत सहभाग आहे की नाही हे स्पष्ट होणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.शासकीय कार्यालयांमध्ये खासगी वाहन चालक म्हणून काम करणारा नितीन ढेरे याने शासकीय गणवेश आणि कारसाठी अंबर दिव्याचा वापर करून अडीच लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने २३ मार्च रोजी पहाटे नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत सापळा रचून तोतया अधिकारी ढेरे आणि त्याचा साथीदार सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांना अटक केली होती. ढेरे याच्या चौकशीत उत्पादन शुल्क विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली.काही अधिका-यांच्या पाठबळामुळेच तो तस्करी करीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी याची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर कार्यालयातील १८ जणांच्या चौकशीचा आदेश काढला. यात काही वरिष्ठ अधिका-यांचाही समावेश आहे. चौकशी अधिकारी सांगलीतील अधीक्षक प्रदीप पोटे यांनी १८ पैकी १० जणांचे जबाब नोंदवले आहेत. उर्वरित जबाब नोंदवून अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.काहींचे धाबे दणाणलेतस्कर ढेरे हा मोबाइलवरून अनेक अधिकारी आणि कर्मचा-यांच्या संपर्कात होता. दारू तस्करीच्या दोन दिवसातही त्याने काही कर्मचा-यांना फोन केले होते. यावरूनच संशय बळावल्याने कर्मचारी आणि अधिका-यांची चौकशी सुरू आहे. यातून महत्त्वाचे पुरावे समोर येणार असल्याने उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि कर्मचा-यांचे धाबे दणाणल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.