शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या पेरणीत सांगली आघाडीवर

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

कोल्हापूर जिल्हा मात्र पिछाडीवर

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -परतीचा मान्सून समाधानकारक झाल्यामुळे विभागात रब्बी पिकांच्या पेरणीत सांगली जिल्हा सध्या आघाडीवर आहे. तब्बल ५३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याउलट कोल्हापूर जिल्हा मात्र पिछाडीवर आहे. या जिल्ह्यात पेरक्षेत्र अतिशय नगण्य आहे. विभागीय कृषी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात अपेक्षेइतकी रब्बीची पेरणी झालेली नाही.  खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागत असतात. यंदा जून महिन्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत खरीप पिकांच्या काढणीला वेग आला आहे. शेतकरी खरीप पिकांची काढणी झालेल्या जमिनीची मशागत करून प्रत्येक वर्षी रब्बी पिकांची पेरणी करीत असतो. सांगली, सातारा जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला गती आली आहे. सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांत परतीच्या मान्सूनने चांगली ‘कृपा’ केली. यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीमध्ये चांगली ओल निर्माण झाली आहे. हवामानही पोषक आहे. यामुळे हा हंगाम साधण्यासाठी शेतकरी जोरदार तयारीला लागले आहेत. ओल कमी होण्याआधीच पेरणीचे काम संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. सातारा जिल्ह्यात ज्वारी ३३५ हेक्टर, मका ११००, इतर तृणधान्ये ३४६००, इतर अन्नधान्ये ३४६०० हेक्टर; तर सांगली जिल्ह्यात ज्वारी ४८७०० हेक्टर, मका ३६००, इतर तृणधान्ये ५२३००, अन्नधान्य ५२३००, करडई ८००, सूर्यफूल ४००, इतर धान्य १००, अन्य धान्ये १३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. परतीचा मान्सूनही सर्वत्र बरसला आहे. यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा रब्बीचे क्षेत्र वाढेल असे वाटते. ज्वारी, गहू, हरभरा यांचे पेरक्षेत्र वाढेल. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करीत आहेत. - डॉ. एन. टी. शिसोदे (सहसंचालक, कृषी विभाग)एकाच वेळी धांदलअनेक ठिकाणी खरीप पिकांच्या काढणीचे आणि रब्बी पिकांच्या पेरणीचे काम जोरात सुरू आहे. यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शिवारात दिसत आहेत. शिवारे फुलून गेली आहेत. मागणी वाढल्यामुळे मजुरांची चणचण भासत आहे. जादा मजुरी देऊन मजुरांना बोलाविले जात आहे. मजुरांचाही भाव वधारला आहे.