शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंची राष्ट्रपतींशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:35 IST

त्यांना राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ भेट दिला.

कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त कोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन विविध राष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. भेटीदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींना डॉ. जयसिंगराव पवार लिखित इंग्रजीतील ‘राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ’ भेट दिला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे राष्ट्रहिताचे व समाजहिताचे कार्य सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विविध माध्यमांतून समाजातील घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि यामध्ये आपण स्वत: लक्ष घालावे, अशी इच्छा संभाजीराजेंनी व्यक्त केली. या चरित्रग्रंथात राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी केलेली मदत या विषयांचा प्रामुख्याने उल्लेख आहे, हे आपण आवर्जून वाचावे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या ग्रंथाचे आपण जरूर वाचन करू, असे नमूद केले. युवराज संभाजीराजे यांनी बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ भेट दिला.