‘सारथी’समोरील आंदोलनाला संभाजीराजे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:33+5:302020-12-13T04:39:33+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत; म्हणून शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेली संस्था ...

Sambhaji Raje's visit to the agitation in front of 'Sarathi' | ‘सारथी’समोरील आंदोलनाला संभाजीराजे यांची भेट

‘सारथी’समोरील आंदोलनाला संभाजीराजे यांची भेट

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत; म्हणून शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेली संस्था बंद पडू नये याविषयी त्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला त्यांनी भेट दिली.

ते म्हणाले, सारथी संस्था ही राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक असून ती वाचवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे. एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगितले असून, कलम २५ नुसार संचालक आम्हाला काहीच अधिकार नाहीत; सरकार निर्णय घेईल असे सांगत आहेत. यावरून अद्यापही या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून, तारादूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत; अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू.

संभाजीराजे हे सारथी संस्थेला भेट देणार असल्याचे माहिती असूनदेखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक उपस्थित नसणे हे चुकीचे आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले.

Web Title: Sambhaji Raje's visit to the agitation in front of 'Sarathi'