Kolhapur: असाच भाजप प्रवेश करायला मी हलकापुलका आहे का?, समरजीत घाटगेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:25 IST2026-01-22T16:22:42+5:302026-01-22T16:25:39+5:30

मंडलिकांनी कागल नगरपालिका लढवली, आता परिणाम दिसत आहेत - हसन मुश्रीफ 

Samarjit Ghatge president of Shahu Group in Kagal reacted to his entry into BJP | Kolhapur: असाच भाजप प्रवेश करायला मी हलकापुलका आहे का?, समरजीत घाटगेंचा टोला

Kolhapur: असाच भाजप प्रवेश करायला मी हलकापुलका आहे का?, समरजीत घाटगेंचा टोला

कोल्हापूर : नगरपालिकेला माजी खासदार संजय मंडलिक यांनी कागलमध्ये निवडणूक लढवली नसती तर ते आता आमच्यासोबत असते, त्याचे परिणाम आता दिसत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप प्रवेशाबाबत ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजीत घाटगे यांना विचारले असता, ‘असाच गडबडीत प्रवेश करायला मी हलकापुलका आहे का?’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळे अनेकांना थांबावे लागले. त्यांची समजूत काढण्याचे काम आम्ही तिघेही करणार आहे. यावेळी, माजी आमदार संजय घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, अंबरीश घाटगे, युवराज पाटील, भय्या माने आदी उपस्थित हाेते.

बाबा म्हणतात, पंचायत समितीला अधिकार द्या

पंचायत समित्यांचे अधिकार कमी केल्याने काहीच करता येत नाही. यासाठी, मंत्री मुश्रीफ यांनी शासनाच्या पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी आमदार संजय घाटगे यांनी केली.

गडहिंग्लज, चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक

गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले असून, ते ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार आहे. भुदरगडमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडी म्हणून सामोरे जात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

एक कशी भाजपच्या तीन जागा

कागलमध्ये आपणाला एकाच जागेवर समाधान मानावे लागल्याबाबत विचारले असता, समरजित घाटगे म्हणाले, एक कोठे तीन जिल्हा (संजय घाटगे दोन) परिषदेच्या आणि ८ पंचायत समितीच्या जागा भाजपला मिळाल्या आहेत.

Web Title : समरजीत घाटगे ने भाजपा में जल्दबाजी में प्रवेश पर सवाल उठाए

Web Summary : समरजीत घाटगे ने भाजपा में जल्दबाजी में प्रवेश की बात को खारिज किया। हसन मुश्रीफ ने स्थानीय चुनाव रणनीतियों पर चर्चा करते हुए गडहिंग्लज और चंदगढ़ में संभावित गठबंधनों का खुलासा किया। संजय घाटगे ने पंचायत समिति की शक्तियों को बढ़ाने की वकालत की।कागल में भाजपा की सीट जीत पर भी प्रकाश डाला गया।

Web Title : Samarjeet Ghatge questions hasty BJP entry; alliance updates revealed.

Web Summary : Samarjeet Ghatge dismissed talks of a rushed BJP entry. Hasan Mushrif discussed local election strategies, revealing potential alliances in Gadhinglaj and Chandgad. Sanjay Ghatge advocated for increased Panchayat Samiti powers. BJP’s seat wins in Kagal were also highlighted.