ZP Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस दारु विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:00 IST2026-02-05T16:58:52+5:302026-02-05T17:00:36+5:30

जिल्ह्यासाठी आदेश : मतमोजणीच्या ठिकाणीही बंदच

Sale of liquor will be banned for three days on the occasion of Kolhapur Zilla Parishad elections | ZP Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस दारु विक्री बंद

ZP Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस दारु विक्री बंद

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने शुक्रवार, शनिवारी आणि सोमवारी जिल्ह्यात निवडणूक कार्यक्षेत्रातील दारू विक्री बंद राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत आदेश पारीत केला असून, सर्व देशी दारूची दुकाने, वाईन शॉप, बीअर शॉप, परमिटरूम बीअरबार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा: निकालानंतर मिरवणूक, साऊंड सिस्टीम, फटाक्यांसह गुलालावर बंदी; आजपासून जमावबंदी

बंद काळात आदेशाचे उल्लंघन करून दारूची विक्री सुरू असल्याचे आढळताच विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होणाऱ्या ठिकाणीही दारू विक्री बंद राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. इतर दिवशी निवडणुका नसलेल्या नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दारू विक्री सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.

Web Title : कोल्हापुर ज़ेडपी चुनाव: कल से तीन दिन शराब बंदी।

Web Summary : कोल्हापुर में ज़ेडपी चुनाव के कारण तीन दिनों तक शराब की बिक्री पर प्रतिबंध रहेगा। राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा जारी आदेश सभी शराब दुकानों पर लागू होता है। उल्लंघन करने वालों पर कार्रवाई की जाएगी। मतगणना के दिन भी बिक्री बंद रहेगी।

Web Title : Kolhapur ZP Election: Liquor ban for three days starting tomorrow.

Web Summary : In Kolhapur, liquor sales are prohibited for three days due to ZP elections. The ban, ordered by the State Excise Department, applies to all liquor shops. Violators will face action. Sales will also be closed on counting day.