शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये चार हजारांवर अर्जांची विक्री

By admin | Updated: July 10, 2015 00:00 IST

ग्रामपंचायत निवडणूक : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींचा समावेश; तहसील कार्यालयावर गर्दी

कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी येथील तहसील कार्यालयाजवळ मोठी गर्दी केल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. आतापर्यंत चार हजारांवर उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे, तर दि. ८ जुलैपर्यंत ४२४ जणांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. आज, शुक्रवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, असे चित्र दिसत आहे.तालुक्यातील ८३ पैकी ५३ ग्रामपंचायतींच्या १८७ प्रभागांतून एकूण ५२८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार कार्यकर्ते, नेतेमंडळी, सूचक-अनुमोदक असा लवाजमा घेऊन तहसील कार्यालयात येत आहेत. अशीच गर्दी इंटरनेट कॅफे, महाईसेवा केंद्र यांच्या दारातही होत आहे. आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागत आहे. तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. तसेच बँकेचे नवीन पासबुक, कागदपत्रांची पूर्तता यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्तेही मेटाकुटीस आले आहेत.तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या धान्य गोडावूनमध्ये निवडणूक विभाग आहे. तेथे प्रचंड गर्दी उसळली आहे. चोहोबाजूंनी या गोडावूनला माणसांचा वेढा पडल्यासारखे चित्र आहे, तर राखीव गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी विभागातून प्रस्ताव दाखल केल्याचे टोकण आणणे बंधनकारक केल्याने त्यांचीही धावपळ उडाली आहे. (प्रतिनिधी)+शिरोळमध्ये ६१४ अर्ज दाखलशिरोळ : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशीही सर्व्हर डाऊनमुळे इच्छुकांची दमछाक झाली. ५० टक्के महिला आरक्षणामुळे महिलांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. गुरुवारचा मुहूर्त साधत ६१४ जणांनी निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केले; तर ४४४ अर्जांची विक्री झाली. गुरुवारअखेर २३८८ अर्जांची विक्री झाली असून, ८१५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार व समर्थकांच्या मोटारसायकली, चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.गडहिंग्लजला सहाव्या दिवशी ४४७ अर्ज गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर दोन गावांत पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी ४४७ अर्ज दाखल झाले. गुरुवारअखेर एकूण ८३१ अर्ज दाखल झाले आहेत.