शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रवाशांच्या जिवाशी खेळ; हेडलाइट बंद तरीही रात्री धावली एसटी -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:12 IST

गगनबावडा : गगनबावडा-नृसिंहवाडी ही एसटी रात्री आठ वाजता साळवण ते गगनबावडा हेडलाइट नसतानाही धावली. यावेळी एकप्रकारे प्रवाशांच्या जिवाशी खेळ ...

गगनबावडा : गगनबावडा-नृसिंहवाडी ही एसटी रात्री आठ वाजता साळवण ते गगनबावडा हेडलाइट नसतानाही धावली. यावेळी एकप्रकारे प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळल्याचा प्रकार घडला.गगनबावडा-नृसिंहवाडी या एसटी (एम.एच. ४० एन ९४४३) बसला साळवण येथे तांत्रिक बिघाड झाल्याने गाडीला लाइट नव्हती. त्यामुळे आगाराने याबाबत ताबडतोब दुसरी गाडी उपलब्ध करणे गरजेचे होते. परंतु, गाडी उपलब्ध नसल्याचे सांगून गाडीला उजेड नसतानाही गाडीमध्ये २०-२५ प्रवासी घेऊन ही एसटी गगनबावड्याकडे निघाली. साळवणमधून जवळपास २६ किमी अंतर रात्री ८ च्या सुमरास लाइट नसतानाही पार करणे म्हणजे प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये गगनबावडा आगाराचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे. यावेळी काही वाहनधारकांच्या उजेडाचा आधार घेऊन ही एसटी धावत होती. पूर्ण अंधारातही बस वाट काढत होती. एकीकडे अपघातांची संख्या वाढत असताना इतक्या रात्री अंधारातून एसटी चालवून गगनबावडा आगाराने यातून काय सध्या केले, अघटित घडल्यास जबाबदार कोण, गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्यास वाहनचालकास संकटात का टाकायचे, यासह अनेक प्रश्न प्रवाशांसह नागरिकांना पडत आहेत.

खराब गाडी उद्या दुरुस्तीला टाकणारयाबाबत गगनबावडा आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता गगनबावडा-नृसिंहवाडी गाडी नादुरुस्त असल्याने एसटी उद्या दुरुस्तीला कोल्हापूरला पाठवणार आहे. त्यामधील काम ताबडतोब करणे शक्य नव्हते. गगनबावडा आगाराकडे गाड्या उपलब्ध नसल्याने असा प्रकार घडला असेल. - सुरेश शिंगाडे, व्यवस्थापक, गगनबावडा आगार

टॅग्स :kolhapurकोल्हापूर