शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खंडणीप्रकरणात सागर चौगुलेचे नाव, पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:53 IST

आणखी काही तोतया पत्रकारांची नावे समोर येणार

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक विक्रेत्याला धमकावून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीत शहरातील एका वृत्तवाहिनीत काम करणारा सागर यशवंतराव चौगुले (वय ४२, रा. कळंबा, ता. करवीर) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही तोतया पत्रकारांचा समावेश असल्याचे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली.तोतया पत्रकार अन्सार मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी लक्ष्मीपुरीतील प्लास्टिक विक्रेत्यास कारवाईची भीती घालून तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर कथित सामाजिक कार्यकर्ता अजित पवार या काही साथीदारांसह खंडणी उकळण्यासाठी संबंधित विक्रेत्याकडे गेला होता. त्यावेळी सागर चौगुले हा दोन कॅमेरामन घेऊन दुकानासमोर गेला. पैसे दिले नाहीत तर न्यूज चॅनेलवर बातमी लागणार, असे त्याने धमकावले. आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केली, अशी माहिती पोलिसांना मिळाली.दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चौगुले याच्यावर गुन्हा दाखल केला. तो मोबाइल बंद करून पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी एक पथक पाठवल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. तोतया पत्रकार अन्सार मुल्ला हा मात्र अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.चौगुलेचे अनेक कारनामेसागर चौगुले याने यापूर्वीही काही लोकांकडून पैसे उकळल्याची चर्चा सुरू आहे. कळंबा येथील एका व्यावसायिकाला बेकायदेशीर बांधकाम आणि उत्खनन केल्याची भीती घालून त्याने पाच लाख रुपये घेतल्याची चर्चा सुरू आहे. याचीही माहिती घेतली जात असून, संबंधितांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन लक्ष्मीपुरी पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJournalistपत्रकार