एस. टी. चालकास मारहाण ; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:07+5:302021-09-23T04:28:07+5:30

इचलकरंजी : येथील वर्धमान चौक ते वंदे मातरम मैदान मार्गावर एस. टी. चालकाला अडवून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गावभाग ...

S. T. Beating the driver; Crime on three | एस. टी. चालकास मारहाण ; तिघांवर गुन्हा

एस. टी. चालकास मारहाण ; तिघांवर गुन्हा

इचलकरंजी : येथील वर्धमान चौक ते वंदे मातरम मैदान मार्गावर एस. टी. चालकाला अडवून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत रमेश भीमराव पाटील (वय ५३, रा. संभाजीपूर) यांनी तक्रार दिली आहे.

मन्या, मुक्या व मोशा (पूर्ण नाव समजले नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रमेश हे एस. टी. चालक म्हणून काम करतात. त्यांनी वाहक अभिजीत मधुकर जाधव यांच्यासोबत एस. टी. (एमएच २० बीएल ४१९७) घेऊन शहापूर आगाराकडे निघाले होते. वर्धमान चौक परिसरात दोन मोटारसायकलींवरून आलेल्या तिघांनी एस. टी. अडवून रमेश यांना खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दरवाजा तोंडावर आपटून जखमी केले, तर अभिजीत यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: S. T. Beating the driver; Crime on three